About Me

ads here
advertise here


 नेवजाबाई हितकारिणी हायस्कूल येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवउपक्रमा अंतर्गत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

 

15 ऑगस्ट 2022 रोजी ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारणी हायस्कूल येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक रणदिवे सर यांच्या हस्ते पार पडला . पाऊस सतत येत असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी दर्शवली व उत्साहाने झेंड्याला वंदन करून झेंडा गीत व राष्ट्रगीत म्हटले.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन परेडचे उत्कृष्ट सादरीकरण केले. परेड निरीक्षण शाळेचे मुख्याध्यापक रणदिवे सर व  उपमुख्याध्यापक नाईक सर, शाळेचे पर्यवेक्षक, घोरूडे सर यांनी केले.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील संपूर्ण शिक्षक वृंद शिक्षिका व इतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारत माता की जय ह्या उदघोषाने मोठ्या उत्साहात साजरा केला.

Click to comment